चालू घडामोडी | 28 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) महाराष्ट्र सरकारने मुंबईत ‘खाऱ्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प’ (डिसॅलिनेशन प्लांट) उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यासह तामिळनाडू, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र असा प्रकल्प उभरणारा देशातला चौथा राज्य ठरणार आहे. 2025 सालापर्यंत हे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पात दररोज 200 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार केले जाणार.

2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3रा जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार मेळावा व प्रदर्शनाचे (RE-INVEST 2020) आभासी उद्घाटन केले.

3) पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन क्षेत्रात दोन देशांमधील सहकार्याचा विकास करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांनी सामंजस्य करार केला आहे. 4) लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांची भारतीय लष्करातील नवीन अभियंता-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ‘69(अ)’ कलमाच्या अन्वये भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या 43 मोबाइल अॅपवर बंदी घातली.

6) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. “नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स” असे संकेतस्थळाचे नाव आहे.

7) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी ‘हिम सुरक्षा अभियान’चा प्रारंभ केला. हा संपूर्ण राज्याची आरोग्यविषयक माहिती वास्तवीक वेळेत संकलित करण्यासाठीचा कार्यक्रम आहे.

8) अफगाणिस्तान देशात काबुल नदीवर ‘शाहतुत धरण’ बांधण्यासाठी भारत सरकार आर्थिक मदत करणार असल्याची भारताने घोषणा केली.

अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार :

आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहिर झाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

अक्षय इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आता हा पुरस्कार अक्षय इंडीकर यांना मिळणार आहे.

आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतायगत सुमारे ३००० सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अक्षय इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सादर :

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी त्याच्या मंचावर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी PNB मेटलाइफ इंडिया विमा कंपनी सोबत करार केला. विशेषत: भारतातल्या बँकिंग व्यवस्था उपलब्ध नसलेल्या तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नावनोंदणी करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून नामनिर्देशित व्यक्तीला 2 लक्ष रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाते. योजनेच्या अंतर्गत विमा हस्तांतरित केला जाऊ शकत नाही तसेच अवधी संपल्यानंतर कोणताही लाभ दिला जात नाही.

‘वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.

‘वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे. वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते. वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 28 नोव्हेंबर 2020”

Leave a Comment