चालू घडामोडी | 26 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

2) भारत देश 2023 साली ‘जी-20 नेत्यांची शिखर परिषद’चे नियोजन करणार आहे.

3) भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत ‘विमानचालन सुरक्षा जागृती सप्ताह 2020’ पाळत आहे.

4) गुवाहाटी शहरातल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी ‘फ्री-स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम’ विकसित केली. या यंत्रणेमार्फत डिजिटल माहिती ऑप्टिकल केबलशिवाय प्रकाशाच्या माध्यमातून दूर अंतरावर पाठवली जाऊ शकते.

5) ‘VIRAL (व्हिनस इन्फ्रारेड अॅटमॉसफियरीक गॅसेस लिंकर) इन्स्ट्रुमेंट’ (किंवा शुक्रयान-1) ही 2025 साली पाठवली जाणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याची शुक्र-मोहीम आहे. VIRAL इन्स्ट्रुमेंटच्या विकासात रशियाची रोसकॉसमॉस अंतराळ संस्था, LATMOS प्रयोगशाळा (फ्रान्स), स्वीडन आणि जर्मनी हे भारताचे सह-भागीदार आहेत. शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी यान पाठविण्यात येणार आहे.

6) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) संघटनेनी जागतिक स्तरावर कोविड-19 लस वितरित करण्याच्या उद्देशाने ‘मॅमोथ ऑपरेशन’ याची रचना केली आहे. संघटना 350 हून अधिक जागतिक भागीदारांसोबत कार्य करीत आहे. जवळपास 92 देशांमध्ये लसीचा पुरवठा केला जाणार आहे.

7) 24 नोव्हेंबर 2020 रोजी चीन देशाने Chang’e-5 (चांग’ई-5) नामक चंद्र मोहीम चंद्राकडे प्रक्षेपित केली. या मोहिमेमार्फत चंद्राच्या अज्ञात भागातून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहे. यान 15 डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर परत येणार.

8) रशियाच्या डेनिल मेदवेदेव याने लंडन शहरात खेळविण्यात आलेली ‘2020 ATP टूर फायनल्स’ ही टेनिस स्पर्धा जिंकली. त्याने पुरुष एकल गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीएमचा पराभव केला.

9) न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

10) ९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी मल्याळम चित्रपट जल्लीकट्टूला नामांकन देण्यात आले आहे.

भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसद सदस्यपदी :

भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमध्ये संसद सदस्य म्हणून शपथ घेत इतिहास रचला आहे. डॉ. शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृत भाषेत शपथ घेतली. गौरव शर्मा मुळचे हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यातील आहेत.

हेमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्मांनी निवडणूक लढवली होती. न्यूझीलंडमधील उच्चायुक्त मुक्तेश परदेशी गौरव शर्मा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसदेचे सर्वात तरुण संसद सदस्य आहेत.

पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “TX2 पुरस्कार” मिळाला :

उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि उत्तरप्रदेश वन विभागाने आंतरराष्ट्रीय किर्तीचा “TX2 पुरस्कार” जिंकला.

ठळक बाबी

  • केवळ 4 वर्षांमध्ये वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे; जेव्हा की 2010 साली पुरस्काराच्या भागीदारांनी वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठण्याचा कालावधी 10 वर्षांचा निश्चित केला होता.
  • पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात केवळ 4 वर्षांमध्ये 40 वाघांची वाढ झाली.
  • पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत आणि शाहजहांपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. भारतात एकूण 13 व्याघ्र प्रकल्प आहेत.

Leave a Comment