चालू घडामोडी | 24 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2020 रोजी केवडिया (गुजरात) येथे दोन दिवस चालणार्याे 80 व्या ‘अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद’ (AIPOC) याचे उद्घाटन होणार आहे.

2) 50,000 पेक्षा जास्त आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्रे (एचडब्ल्यूसी) कार्यान्वित करून भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला.

3) मेघालयची राजधानी शिलाँग येथे दरवर्षी ‘भारत आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम महोत्सव’ आयोजित केला जातो. यावर्षी महामारीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हिवाळ्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत चेरी झाडाला सुंदर फुलांचा बहर येतो. या घटनेचे स्वागत या कार्यक्रमाने केले जाते.

4) तामिळनाडूच्या कीझाडी येथे झालेल्या उत्खननात नॅनो (अतिसूक्ष्म) पदार्थापासून तयार केलेल्या भांडी / पात्र सापडल्या आहेत. त्या आतापर्यंतच्या सर्वात प्राचीन ज्ञात असलेल्या मानवनिर्मित नॅनो-रचना ठरल्या आहेत. भांड्यांना “विशिष्ट काळा थर” दिला गेला आहे आणि त्या रचना इ.स.पू. 600 मधील आहेत. 2600 वर्षांपूर्वी कोणते तंत्र ही भांडी बनविण्यासाठी वापरले गेले हा मुख्य प्रश्न आहे.

5) कामगार सुरक्षा व कामगार संघटना मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्य परिस्थिती नियम 2020 अंतर्गत नियमांच्या मसुद्याची अधिसूचना दिली.

6) केरळमध्ये वेलायणी-पुंचकरी भात शेतात ‘विलोव वॉर्बलर (शास्त्रीय नाव: फिलोस्कोपस ट्रोचिलस)’ पक्षी आढळून आला. हा पक्षी प्रथमच भारतात आढळला आहे. हा सर्वात दीर्घ पल्ल्यावर स्थलांतरण करणारा, आकाराने छोटा असलेला एक पक्षी आहे, जो मुळतः संपूर्ण उत्तर आणि समशीतोष्ण युरोप आणि पॅलॅरेक्टिक प्रदेशात प्रजनन करतो. त्याचे वजन सुमारे 10 ग्रॅम असते. ते हिवाळ्याच्या सुरुवातीला उप-सहारा आफ्रिकेकडे स्थलांतर करतात.

7) 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर 2020 रोजी भारत, सिंगापूर आणि थायलँड यांच्या नौदलांच्या दरम्यान ‘SITMEX-20’ नामक त्रिपक्षी सागरी कवायत आयोजित करण्यात आली होती. 2020 सालाची ही कवायत सिंगापूर नौदलाने आयोजित केली. अंदमानच्या समुद्रात ही कवायत आयोजित करण्यात आली होती.

8) सौदी अरब देशाने 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर 2020 रोजी 15 व्या ‘जी-20 शिखर परिषद’ याचे आयोजन केले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. “सर्वांसाठी एकविसाव्या शतकाच्या संधी साकारणे” या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

9) आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे २३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

जल जीवन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 5 नव्या तंत्रांची मदत :

जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातल्या बहुशाखीय तांत्रिक समितीकडून पाच अभिनव तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी पेयजल पुरविण्यासाठी तीन प्रकारच्या तर स्वच्छतेसाठी दोन तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे.

शिफारस केलेले तंत्र

  • ग्रुंडफोस एक्युप्युअर – सौर ऊर्जेवर चालणारा जल शुद्धिकरण, जल प्रक्रिया प्रकल्प
  • जनजल ‘वॉटर ऑन व्हील’ – ही इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी यंत्रणा आहे, ज्यामार्फत वैश्विक स्थान प्रणालीने (GPS) सक्षम असलेल्या विजेरी वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सुरक्षित पाणी पुरविले जाणार.
  • प्रीस्टो ऑनलाइन क्लोरिनेटर – हे पाण्यातील प्रदूषण दूर करून पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे विजेचा वापर न करणारे ऑनलाइन क्लोरिनेटर आहे.
  • जॉकासौ तंत्रज्ञान – हे सांडपाणी, स्वयंपाकघर आणि स्नानासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत बसवले जाणारे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
  • एफबीटेक – या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून जलशुद्धी केले जाते.

Leave a Comment