चालू घडामोडी | 23 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) किसान दिन किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.

2) दूरसंचार विभागाच्यावतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार कौशल्य उत्कृष्टता पुरस्कार’ यांचे वाटप करण्यात आले आहे. यंदा हे पुरस्कार श्रीनिवास करनम (प्रथम पुरस्कार) आणि प्रा. सुब्रत कार (द्वितीय पुरस्कार) यांना देण्यात आले आहेत.

3) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने नंद किशोर यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL&FS) याच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यांची विजय कुमार यांच्या जागी नियुक्ती झाली आहे.

4) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल (HWT)’ याचे उद्घाटन झाले. हायपरसॉनिक विमाने, क्षेपणास्त्र, इंजिन यांच्या चाचण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. देशी बनावटीची अशी सुविधा विकसित करणारा भारत हा अमेरिका अणि रशियानंतर जगातला तिसरा देश ठरला आहे.

5) गुरुग्राम (हरयाणा) शहरातल्या ग्वाल पहाडी येथील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) याच्या परिसरात ऊर्जा क्षेत्रात कौशल्य विकासाचे पहिले उत्कृष्टता केंद्र (CoE) याची स्थापना करण्यात आली आहे.

6) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांची एक समिती नेमण्यात आली आहे. समिती 1994 सालाच्या ISRO “बनाव” प्रकरणात जबाबदार असणाऱ्या विश्वासघातकी अधिकाऱ्यांना शोधण्याचे काम सुरू करणार. त्या प्रकरणामुळे प्रसिद्ध शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची प्रतिष्ठा नष्ट झाली होती.

7) अशोकनगर (उत्तर 24-परगणा, पश्चिम बंगाल) येथील देशातल्या आठव्या तेल व वायू उत्पादन प्रकल्पाचे (किंवा ऊर्जा निर्मिती खोऱ्याचे) राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. अशोकनगर-1 येथील विहीर तेलनिर्मितीची पहिली विहीर म्हणून भारत सरकारच्या जलद उत्पन्न योजनेच्या अंतर्गत पूर्ण झाली. बंगाल खोरे सुमारे 1.22 लक्ष चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे, ज्याचा दोन तृतीयांश भाग बंगालच्या उपसागराच्या पाण्याखाली येतो.

8) 21 डिसेंबर 2020 रोजी नौदलाचे वाइस अॅडमिरल संदीप नैथानी यांनी ‘नियंत्रक (युद्धनौका उत्पादन व संपादन)’ याचा पदभार स्वीकारला.

9) तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात माकडांसाठी दक्षिण भारतातले पहिले बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे. असेच एक केंद्र हिमाचल प्रदेशामध्ये देखील आहे.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेत ललिता, कविताचा समावेश :

ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत यांचा महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या दोन समित्यांवर समावेश करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत माजी ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला हे पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले.

कविताने २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर आणि ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले होते. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. ललिताने २०१४च्या आशियाई स्पर्धेत स्टिपलचेस प्रकाराचे कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे ती २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.

सुमारीवाला, ललिता आणि कविता यांच्यासह रचिता मिस्त्री आणि आनंद मेनेझेस हे ऑलिम्पियनसुद्धा कार्यकारी समितीचा भाग असतील. रचिता यांच्याकडे महिला समितीचे तर मेनेझेस यांच्याकडे मॅरेथॉन आणि रोड रेस समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

त्याचबरोबर आशियाई स्पर्धेतील पदकविजेते होमियार मिस्त्री यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय धावपटू शरद सूर्यवंशी हे वरिष्ठ सहसचिव म्हणून काम पाहतील.

देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल :

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल प्रकाशित करण्यात आला.

ठळक माहिती

वर्ष 2018 मध्ये, भारतात आता 12,852 बिबटे असून 2014च्या सर्वेक्षणात ही संख्या 7910 होती. अर्थात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.

मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3421, 1783 आणि 1690 बिबटे असल्याचा अंदाज आहे.

पूर्व घाटात सर्वाधिक म्हणजेच 8.71 बिबटे तर पश्चिम घाटात 3387 बिबटे आढळून आली आहेत.

बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.

संरक्षित आणि बहुउपयोगी जंगल परिसरात वाघ आणि बिबटे आढळतात. बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 23 डिसेंबर 2020”

  1. Khoup gap padla ahe current affairs madhe please day to day cha current affairs takat java 24dec to 29 December cha current affairs nahit aplya current affairs cha notes good astaat please so current affairs complete kra

    Reply

Leave a Comment