चालू घडामोडी | 22 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपीय प्रदेशातल्या लक्झेमबर्ग देशाच्या ग्रँड ड्यूसीचे पंतप्रधान झेवियर बिटल यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी आभासी पद्धतीने प्रथमच भारत-लक्झेमबर्ग शिखर परिषदेचे आयोजन केले होते.

2) दिल्ली-गाझियाबाद-मेरठ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) प्रकल्पासाठी भारत सरकारने नवीन विकास बँकेसोबत (NDB) 500 दशलक्ष डॉलर एवढ्या कर्जासाठी करार केला.

3) ओडिशाच्या महानदी खोऱ्यात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्रालयाच्यावतीने ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या भूकंप सर्वेक्षण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

4) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजी आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हंगेरी, मालदीव, चाड, ताजिकिस्तान या चार देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांच्या परिचय पत्रांचा स्वीकार केला.

5) केंद्र सरकारने जाहीर केलेले ‘आर्थिक पॅकेज’ देशातील निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देणारे असून रोजगारवाढीचे प्रमाणही त्यातून विस्तारेल, असा आशावाद मूडीजने व्यक्त केला आहे. परिणामी भारताचा चालू आर्थिक वर्षांत विकास दर आधीच्या अंदाजापेक्षा काहीसा अधिक म्हणजे उणे १०.६ टक्के राहिल, असेही तिने स्पष्ट केले आहे.

6) उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये भारताची पहिली मॉस बाग विकसित केली गेली. मॉस आणि इतर ब्रायोफाईट्सच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी बाग विकसित केली गेली.

7) आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आसाममध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी “आभासी न्यायालय (वाहतूक)” आणि “ई-चालान” प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्लोबल सिटिझन पुरस्कारासाठी मुंबईच्या तरुणीला नामांकन :

झोपडपट्टी भागांतील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्याबरोबरच, त्याबाबतच्या उत्पादनांत या महिलांना सहभागी करून घेत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या २६ वर्षीय सुहानी जलोटा या मुंबईकर तरुणीला ‘ग्लोबल सिटिझन पुरस्कार : सिस्को युथ लीडरशिप अवार्ड’साठी नामांकन प्राप्त झाले आहे.

या पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या आणि अंतिम तीन जणांमध्ये स्थान मिळवलेल्या सुहानी जलोटा या एकमेव भारतीय आहेत.

भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला :

हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले आहे.

“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये सहाय्य करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार.

Leave a Comment