चालू घडामोडी | 21 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी 21 नोव्हेंबर या दिवशी जगभरात ‘जागतिक दूरदर्शन दिन’ साजरा केला जातो.

2) मत्स्यपालन मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळाच्यावतीने आसाम राज्याला मत्स्यव्यवसाय क्षेत्रात चार पुरस्कार मिळाले.

2) TRACE इंटरनॅशनल संस्थेकडून लाचखोरी जोखीमसंबंधी जागतिक यादी तयार केली आहे. ‘TRACE ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020’ याच्या यादीत 45 गुणांसह भारताचा 77 वा क्रमांक आहे.

3) गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’चे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम देशभरातल्या 243 शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. 4) मैया सांडू या मोल्दोवा देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती आहे. त्यांनी 2020 सालाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.

5) भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांना त्यांच्या लेखन, कविता आणि इतर साहित्यिक कामांसाठी लंडनच्या वातायन-यूके संस्थेच्यावतीने ‘वातायन जीवनगौरव पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले जाणार आहे.

6) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय ‘प्रधान मंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राईजेस (PM-FME)’ योजनेची अंमलबजावणी करीत आहे. योजनेच्या अंतर्गत क्षमता निर्मिती कार्यक्रमाला 18 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात झाली.

7) अन्नप्रक्रिया मंत्रालयाने भारताचा ‘GIS एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ डिजिटल नकाशा तयार केला आहे. हा नकाशा सर्व भागधारकांना उत्पादनांविषयी तपशीलवार माहिती उपलब्ध करून देतो.

8) 19 नोव्हेंबर – जागतिक शौचालय दिन: यावर्षीचा विषय ‘सस्टेनेबल सॅनिटेशन अँड क्लायमेट चेंज’

9) दक्षिण चीन समुद्र आणि संपूर्ण पॅसिफिक बेटांच्या देशातील चीनच्या प्रभावाच्या वाढीस प्रतिकार करण्यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाने एक महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर (पारस्परिक भेटीचा करार- RAA) स्वाक्षरी केली.

भारताचा ‘परम सिद्धी’ जगातला 63 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली महासंगणक :

भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग” (C-DAC) येथे नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन (NSM) अंतर्गत प्रस्थापित केलेल्या उच्च कामगिरी संगणन-कृत्रीम बुद्धिमत्ता (HPC-AI) महासंगणक “परम सिद्धि” याने जगातल्या अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींच्या जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे.

परम सिद्धी महासंगणक NVIDA डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी-डॅकच्या स्वदेशी विकसित HPC-AI इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ही प्रणाली सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन अश्या प्रगत तंत्रामध्ये मदत करीत आहे.

डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ला बुकर पुरस्कार :

न्यूयॉर्कस्थित आणि मूळ स्कॉटलंडचे नागरिक असलेले लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकला या वर्षीचे बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे.

स्टुअर्ट यांचे हे पहिलेच पुस्तक असून या पुस्तकात त्यांनी 1980 च्या काळात प्रेम आणि मद्याच्या आहारी जाण्याबाबतच्या अनुभवांचे कथन केले आहे.

Leave a Comment