चालू घडामोडी | 2 फेब्रुवारी 2021

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिन ‘जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

2) वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पोर्टलवरील 8व्या भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन झाले.

3) देशभरात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सुमारे 89 लाख मुलांना पोलिओ थेंब देण्यात आले.

4) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेने तयार केलेल्या ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी 2023 साली घेतली जाणार आहे. तेजस विमान एका इंजिनवर चालणारे हलके लढाऊ विमान आहे.

5) सौरभ चौधरी हा प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला. दिव्यांश सिंग पनवरने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटात तर महिला गटात राजेश्वरी कुमारीने सुवर्णपदक जिंकले.

6) केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी 29 जानेवारी 2021 रोजी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले. आर्थिक वर्ष 2021-22 यामध्ये भारताचा वास्तविक GDP 11 टक्क्यांनी वाढणार आणि सांकेतिक GDP दर 15.4 टक्क्यांनी वाढणार, असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2020-21 यामध्ये भारताचा GDP वृद्धि दर उणे 7.7 टक्के राहणार, असा अंदाज आहे.

7) समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

8) ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत भारत 86 व्या क्रमांकावर आहे. यादीत प्रथम क्रमांकावर न्यूझीलँड आणि डेन्मार्क हे देश आहेत. यादीत तळाशी दक्षिण सुदान आणि सोमालिया हे देश 179 व्या क्रमांकावर (सर्वात भ्रष्ट) आहेत.

ASEAN-इंडिया हॅकेथॉन 2021 :

भारत आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे संघ (ASEAN) मधील संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘ASEAN-इंडिया हॅकेथॉन’ या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

हॅकेथॉन भारत आणि ASEAN देशांना “नील अर्थव्यवस्था” आणि “शिक्षण” या दोन व्यापक संकल्पनांतर्गत सामायिक आव्हाने सोडवण्याची एक संधी उपलब्ध करुन देईल आणि त्यायोगे शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्याद्वारे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध पुढे नेण्याची संधी उपलब्ध करेल.

हॅकेथॉन भारतीय संस्कृतीतील सहा मूलभूत गुणांवर (आदर, संवाद, सहकार्य, शांतता, समृद्धी आणि नवसंशोधन) आधारित आहे.

‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भाव्या लाल :

भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे.

भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अॅिडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अॅचडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.

त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या. एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत.

त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Comment