चालू घडामोडी | 19 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन (International Men’s Day) साजरा केला जातो.

2) महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यात ‘जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल’ ही संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशियातली पहिली मिल उभारली जात आहे.

3) रिझर्व्ह बँकेने कमकुवत आर्थिक स्थिती पाहता लक्ष्मीविलास बँक लिमिटेडला तातडीने प्रभावी स्थगिती दिली आहे.

4) लार्सन अँड टुब्रो या कंपनीने गगनयान मोहिमेचा ‘बूस्टर’ हा पहिला भाग भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (ISRO) सोपवला. गगनयान मोहिमेमधून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात येणार आहे, जे पूर्णपणे स्वदेशी प्रयत्नांमधून घडवले जात आहे.

5) बेलारूसची आर्यना सबलेन्का हिने ‘लिन्झ ओपन’ या टेनिस स्पर्धेत महिला एकल गटाचा शेवटचा सामना जिंकला.

6) जपानचे सोची नोगुची हे गेल्या 40 वर्षात तीन प्रकाराच्या अंतराळयानाने पाठविण्यात आलेली पहिली व्यक्ती ठरली. अलीकडेच त्यांना इतर तीन जणांसोबत स्पेसएक्स कंपनीच्या ‘रेजिलन्स’ नामक कॅप्सूलमधून प्रक्षेपकाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठविण्यात आले आहे.

7) आर्थिक क्षेत्रात प्रगत तंत्राचा अंतर्भाव करण्याच्या उद्देशाने त्याबाबत संशोधनात्मक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी क्रिस गोपालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ‘रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH)’ नामक एका अभिनवता केंद्राची स्थापना केली.

8) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थेनी स्त्रियांना ‘समान आणि योग्य’ वागणूक देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी ‘लीलावती पुरस्कार’ची स्थापना केली.

9) ज्येष्ठ अभिनेते आणि दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त सौमित्र चटर्जी यांचे कोलकाता येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.

जम्मू-काश्मीरमध्ये वन हक्क कायदा लागू:

जम्मू-काश्मीरमध्ये वन हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याने केंद्रशासित प्रदेशात प्रथमच वन-रहिवासी समुदायांच्या अधिकारांना मान्यता दिली.

जम्मू-काश्मीर सरकारने ‘वनहक्कांची नोंद’ पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत दिली आहे.

हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा : मेंडोसाला जेतेपद

भारताचा १४ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर लायन मेंडोसाने हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याबरोबरच गोव्याच्या या युवा खेळाडूने ग्रँडमास्टर किताबासाठीचा दुसरा टप्पा पार केला.

ग्रँडमास्टर किताब पटकावण्यासाठी मेंडोसाला आता तिसरा टप्पा पार करावा लागणार आहे. मेंडोसाचे एलो मानांकन २५१६ असून हंगेरीतील स्पर्धा त्याने ७.५ गुणांसह जिंकली. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकही पराभव पत्करला नाही.

याउलट त्याने स्पर्धेत दोन ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवला. या स्पर्धेतील अव्वल खेळाडू आणि हंगेरीचा ग्रँडमास्टर फोगारासी टिबोरवरील मेंडोसाचा विजय विशेष होता. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत मेंडोसाने सहा विजय आणि तीन बरोबरी अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट” :

दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर प्रदेशातले चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्याच्या हेतूने 17 नोव्हेंबर 2020 रोजी जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दरम्यान “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट” नामक एक करार झाला.

करारामुळे जपानी आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांना परस्परांच्या देशांची भेट घेण्यास तसेच प्रशिक्षण व संयुक्त मोहिमा आयोजित करण्याची परवानगी मिळते.

Leave a Comment