चालू घडामोडी | 18 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) उत्तरप्रदेशाच्या आग्रा शहरातले सूर सरोवर याला रामसार स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

2) जगातली सर्वात दुर्गम मानवी वस्ती असलेल्या ब्रिटन सरकारच्या प्रशासनाखाली येणाऱ्या ट्रिस्टन डा कुन्ह या ठिकाणाला अटलांटिक महासागरातले सर्वात मोठे पूर्णपणे संरक्षित सागरी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते क्षेत्र जवळपास 687000 चौरस किलोमीटर एवढे आहे.

3) पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात बालकांसाठी जगातल्या पहिल्या ट्राम ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याला ‘कोलकाता यंग रीडर्स ट्रामकार’ असे नाव देण्यात आले.

4) ASEAN (इंडोनेशिया, थायलँड, फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, कंबोडिया, लाओस, ब्रुनेई) आणि चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड अश्या 15 देशांनी जगातला सर्वात मोठा व्यापार क्षेत्र स्थापन करण्यासाठी ‘क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP)’ यावर स्वाक्षरी केली.

5) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय “कुशल भारत” अभियानाची अंमलबजावणी करीत आहे. ही एकछत्री योजना असून त्यांची घोषणा 2015 साली केंद्र सरकारने केली होती. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्यावतीने ही योजना राबविण्यात येत आहे.

6) अभिनेता सोनू सूद यांची भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पंजाबची राज्य प्रतीक म्हणून नियुक्ती केली आहे.

7) लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

अरबी समुद्राच्या उत्तर भागात ‘मलबार 2020’ कवायतीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ :

‘मलबार’ सागरी कवायतीच्या 24 व्या आवृत्तीच्या द्वितीय टप्प्याला अरबी समुद्राच्या उत्तर भागात सुरुवात झाली आहे. कवायत 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होत आहे.

ठळक बाबी :

  • या टप्प्यात दोन युद्धनौकासह इतर जहाजे, पाणबुड्या आणि नौदलातली विमाने यांना घेऊन चार दिवस उच्च तीव्रतेची नौदल प्रात्यक्षिके केली जाणार.
  • भारताकडून या सरावात ‘INS विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका आणि त्यातल्या लढाऊ विमानांसोबत स्वदेशी बनावटीच्या INS कोलकाता आणि INS चेन्नई  या विनाशिका, ‘INS तलवार’ स्टिल्थ फ्रीगेट, ‘INS दीपक’ फ्लीट सपोर्ट नौका आणि महत्त्वाची हेलिकॉप्टरही सहभागी होणार आहेत, ज्यांचे नेतृत्व रियर अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्याकडे आहे. ‘मलबार’ सागरी कवायतीच्या 24 व्या आवृत्तीचे आयोजन नोव्हेंबर 2020 महिन्यात दोन टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे.
  • पहिल्या टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 या कालावधीत केले गेले. विशाखापट्टणम येथे बंगालच्या खाडीत ही संयुक्त कवायत झाली. पहिल्या टप्प्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांची पथके सहभागी झाली होती.

राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणीत :

परभणी तालुक्यात जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या उभारणीला लवकरच आरंभ होत असूून सौरऊर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली सूतगिरणी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे सहकार तत्त्वावरील मराठवाडय़ातील पहिली महिला सूतगिरणी म्हणूनही या गिरणीची नोंद होणार आहे. परभणी जिल्ह्यत दरवषी कापूस लाखो क्विंटल कापूसाचे उत्पादन होते. ज्या भागात कापूस पिकत नाही अशा सांगोला, इचलकरंजी, कोल्हापूर या भागात सहकारी तसेच खासगी सूतगिरण्या संपूर्ण क्षमतेने चालतात मात्र परभणी जिल्ह्यत सूतगिरणी का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

त्याची कारणे राजकीय नेतृत्वाचा नाकर्तेपणा आणि जिल्ह्यतील सहकाराच्या अधोगतीत आहेत, मात्र या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा सकारात्मक प्रयत्न आमदार राहुल पाटील यांनी केला आहे. तेच या सूतगिरणीचे प्रवर्तक आहेत. एरंडेश्वर, नांदगाव शिवारात ही सूतगिरणी साकारत आहे. ही सूतगिरणी २५००० चकत्यांची असून हा प्रकल्प शंभर कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी यंत्रसामग्री आयात केली जात आहे.

Leave a Comment