चालू घडामोडी | 16 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) असहिष्णुतेचे धोके याबद्दल जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization -UNESCO) कडून 1995 सालापासून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस (International Day for Tolerance) साजरा करण्यात येत आहे.

2) वस्त्रोद्योग मंत्रालयाने ‘#लोकल4दिवाली’ मोहीमेचा प्रारंभ केला असून, सर्वांना भारतीय हस्तकला खरेदी करून भेट देऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले गेले.

3) इंटरनॅशनल वॅक्सिन अॅक्सेस सेंटर (IVAC) या संस्थेनी 11 वा वार्षिक ‘न्यूमोनिया आणि अतिसार प्रगती अहवाल’ प्रसिद्ध केला.

4) 13 नोव्हेंबर 2020 रोजी भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिन पाळला गेला. यावर्षी “कोविड-19 यासाठी आयुर्वेद” या विषयाखाली हा दिवस पाळला गेला. दिवाळीच्या दिवसांमध्ये धानोत्रयदशी या दिवशी दरवर्षी भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिन पाळतात.

5) सायबर गुंडगिरी रोखण्यासाठी “सायबर टीन्स” नामक सामाजिक संस्था आणि मोबाईल अॅपची स्थापना करण्यासाठी सादात रहमान (बांगलादेश) याला 2020 साली आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार देण्यात आला.

6) चेन्नईच्या CSIR-संरचना अभियांत्रिकी संशोधन केंद्र (SERC) या संशोधन संस्थेनी ट्रान्समिशन लाइन टॉवर ठप्प पडल्यास विद्युत संप्रेषणाच्या द्रुत पुनर्प्राप्तीसाठी एमर्जन्सी रिट्रायव्हल सिस्टम (ERS) नामक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले.

7) ‘खरीप विपणन हंगाम (KMS) 2020’ याच्यानुसार, पंजाब सर्वाधिक धान उत्पादन घेणारे राज्य आहे. एकट्या पंजाबमध्ये देशाच्या एकूण धान उत्पादनाच्या 69.91 टक्के उत्पन्न घेतले गेले.

8) दिल्लीतील वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने नुकतीच ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ मोहीम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसेप व्यापार करारावर १५ प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या :

‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी (रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया-पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.

हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. ‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.

जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा ३० टक्के आहे. २०१२ मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.

हॅमिल्टनला सातवे जगज्जेतेपद :

ओलसर अशा ट्रॅकवर निर्विवाद वर्चस्व गाजवत तुर्कीश ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले आणि सातव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला.

या कामगिरीसह त्याने मायकेल शूमाकर याच्या सात जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

या मोसमातील १०वी शर्यत जिंकत हॅमिल्टनने कारकीर्दीत ९४ जेतेपदे पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

1 thought on “चालू घडामोडी | 16 नोव्हेंबर 2020”

Leave a Comment