चालू घडामोडी | 16 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतभर १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

2) अपंगांना सहाय्यक उपकरणे वाटप करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र सिस्टम फॉर हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन असिस्टेंस” किंवा “महाशरद” या नावाने एका डिजिटल मंचाचा शुभारंभ केला.

3) ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) भारत क्रिडा पुरस्कार 2020’ समारंभात कुस्तीपटू बजरंग पुनिया (पुरुष) आणि नेमबाज इलावेनिल वलारीवन (महिला) यांना ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ सन्मान जाहीर झाला.

4) कोलकाता येथे गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE) येथे उभारण्यात येणाऱ्या तीन प्रकल्प 17 A जहाजांपैकी पहिले जहाज हिमगिरी सुरू करण्यात आले.

5) कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने ‘BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड’ किंवा BEAM नामक एका इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंचाची घोषणा केली आहे.

6) भारताच्या पहिल्या स्वदेशी उमेदवार mRNA लसीला पहिला/दूसरा टप्प्याची मानवी वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. HGCO19 ही स्वदेशी उमेदवार mRNA लस पुणे शहरातल्या जेनोवा कंपनीने विकसित केली आहे.

7) सेवानिवृत्त कर्नल पृथ्वीपालसिंग गिल भुदल, नौदल आणि हवाई दलात सेवा दिलेले एकमेव भारतीय आहेत. त्यांचे नुकतेच निधन झाले.

8) केशव सुरी फाउंडेशनने भारताचा पहिला ‘LGBT+ कार्यस्थळ समानता निर्देशांक’ जाहीर केला आहे. निर्देशांक FICCI, प्राइड सर्कल आणि स्टोनवॉल यूके या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी तृतीयपंथी आणि समलैंगिक लोकांना समान संधी मिळावी या उद्देशाने कंपन्यांनी स्वीकारलेल्या विविधतापूर्ण आणि समावेशन पद्धतींची माहिती स्पष्ट करतो.

9) ओडिशा राज्यात ‘2023 आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) पुरुष हॉकी विश्वचषक’ स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

यंदा प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे :

प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आमंत्रित केले होते.

तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटीश पंतप्रधान पुढच्या महिन्यात भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.

ब्रेकडान्सिंग: 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा क्रिडाप्रकार

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) युवा प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्रेकडान्सिंग’ याला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला. ब्रेकडान्सिंगला “ब्रेकिंग” या नावाने संबोधले जाणार आहे. आता, ब्रेकडान्सिंग हा एक अधिकृत ऑलिम्पिक खेळ बनला.

हा खेळ 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळणार. त्याव्यतिरिक्त, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. या तीन खेळांचा समावेश टोकियो (जपान) शहरात 23 जुलै 2021 पासून होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केला जाणार आहे.

Leave a Comment