चालू घडामोडी | 15 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या द्वितीय तिमाहीत (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) भारताची अर्थव्यवस्थेत 8.6 टक्क्यांनी घट होणार.

2) कर्नाटकाच्या म्हैसूर शहरात अशोकपुरम येथील अरण्य भवनात भारतातले पहिले ‘चंदन संग्रहालय’ उभारण्यात येत आहे.

3) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान (PM-KUSUM) योजनेची अंमलबजावणी करीत आहे. शेतकऱ्यांसाठी देशभरात ग्रीडशी जोडलेले सौर पंप प्रकल्प उभारणे, हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

4) अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशात ‘स्ट्रीप्ड बबल-नेस्ट फ्रॉग’ (शास्त्रीय नाव: रोहानिक्सलस विटाटस) नामक ट्रीफ्रॉग वंश-कुटुंबातली नवीन जात सापडली.

5) किशोरवयीनांची सायबर छळापासून सुटका करणारे ऍप तयार करणाऱ्या सादत रहमान या बांगलादेशी किशोरवयीन मुलाला जागतिक शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

6) सिक्किमचे चौथे मुख्यमंत्री राहिलेले संचमन लिम्बू यांचे 13 नोव्हेंबर 2020 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 17 जून 1994 ते 12 डिसेंबर 1994 पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.

IRCTC डिसेंबरमध्ये ‘भारत दर्शन यात्रा’ सुरू करणार :

इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) 12 डिसेंबरपासून ‘भारत दर्शन-भारत दक्षिण यात्रा’ सुरू करणार आहे. भारत दर्शन यात्रा हैदराबाद आणि सिकंदराबाद येथून 12 ते 18 डिसेंबर दरम्यान चालविण्यात येईल. या ट्रिपची थीम ‘शो इंडिया टू इंडियन्स’ असेल.

वस्त्रोद्योग मंत्रालयाने ‘#लोकल4दिवाली’ अभियान राबविले :

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने दिवाळीनिमित्त ‘#लोकल4दिवाली’ नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम देशातील सांस्कृतिक वारसा तसेच अनेक लोकांच्या रोजीरोटीचे साधन असलेल्या भारतीय हस्तकलेला चालना देण्यासाठी सुरू केली गेली आहे.

‘# लोकल 4 दिवाळी’ अभियानाचा उद्देश

  • ‘#लोकल4दिवाली’ अभियानाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे लोकांना या दिवाळीनिमित्त भारतीय हस्तकलेची उत्पादने खरेदी व भेट म्हणून उद्युक्त करणे.
  • या मोहिमेचे मूळ उद्दीष्ट म्हणजे भारतीय हस्तकला आणि कारागीरांना प्रोत्साहन देणे.
  • ही मोहीम हस्तशिल्प कारागीर व कामगारांना त्यांची विक्री वाढविण्यात आणि त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यास मदत करेल.
  • पंतप्रधान मोदींनी ‘व्होकल फॉर लोकल’ या कल्पनेला प्रोत्साहन दिल्यानंतर प्रत्येक विभाग स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वावलंबी भारत मोहिमेला बळ देण्याच्या दिशेने काम करत आहे.

Leave a Comment