चालू घडामोडी | 14 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 14 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन 1991 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने वाढत्या मधुमेहावर जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

2) ओडिशा राज्याच्या शेतकऱ्यांसाठी ‘सेचा समाधान’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना थेट राज्य जलसंपदा विभागाशी जोडण्यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली.

3) ‘शो इंडिया टू इंडियन्स’ हा इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) याच्या ‘भारत दर्शन – दक्षिण भारत यात्रा’ कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमाचा 12 डिसेंबरपासून हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरातून आरंभ होणार आणि 18 डिसेंबर पर्यंत चालणार.

4) पेटीएम या ई-वाणिज्य देयक प्रणालीने व्यवसायांसाठी ‘पेआउट लिंक’ सादर केल्या आहेत. ते व्यवसायांना त्यांचा बँक तपशील न घेता ग्राहकांना, कर्मचार्‍यांना आणि विक्रेत्यांना तत्काळ देयके देण्याच्या प्रक्रियेस परवानगी देणार.

5) श्यप प्रमोद पटेल (उर्फ कश पटेल) यांची अमेरिकेचे प्रभारी संरक्षण सचिव यांच्या देखरेखीखाली चीफ ऑफ स्टाफ या पदावर नेमणूक झाली.

6) भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 10 नोव्हेंबर 2020 रोजी जिबूती बंदरामध्ये दाखल झाले. या मोहिमेमधून भारत सरकारकडून आपल्या मित्र देशांना नैसर्गिक संकटे आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे.

लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित :

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्टातून घोषित झालेले दुसरे ‘रामसर’ स्थळ आहे.

ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. आतापर्यंत जगात २२०० पाणथळ स्थळ असल्याची नोंद आहे. ‘रामसर’ संकेस्थळावर ११ नाेव्हेंबर २०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे.

यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. हल्ली लोणार खाऱ्या पाण्याचे तळे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असून, त्याचे नियंत्रण त्यांच्याचकडे आहे. लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांनी ट्विट करून वनखात्याचे कौतुक केले.

पोस्टमनमार्फत दारातच डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करून घेण्यासाठी IPPBचा उपक्रम :

12 नोव्‍हेंबर 2020 रोजी टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे  निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक विभागाच्या पुढाकाराने निवृत्तीवेतनधारकांना पोस्टमनमार्फत निवासस्थानाच्या दारात ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ जमा करून घेण्याची सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे.

आता कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्यावतीने IPPB मार्फत निवृत्तीधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अगदी दारापर्यंत सुविधा देण्यात येणार आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांचे जाळे संपूर्ण देशामध्ये आहे, त्याचा उपयोग आता यासाठी करण्यात येणार आहे.

‘वगीर’: पाचवी स्कॉर्पियन पाणबुडी :

12 नोव्‍हेंबर 2020 रोजी विजया श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘वागीर’ या स्कॉर्पियन श्रेणीच्या पाचव्या पाणबुडीचे मुंबईच्या माझगाव गोदीत जलावतरण झाले.

  • पाणबुडी प्रोजेक्ट-75 अंतर्गत भारतीय नौदलासाठी भारतातच तयार करण्यात आली.
  • नौदलाच्या प्रोजेक्ट-75 अंतर्गत स्कॉर्पियन पाणबुडी प्रकल्पातल्या सहापैकी INS कलवरी आणि INS खान्देरी या दोन पाणबुड्या याआधीच नौदलात दाखल झाल्या असून उर्वरित ‘करंज’ आणि ‘वेला’ या दोन पाणबुड्यांच्या सागरी चाचण्या चाललेल्या आहेत.

Leave a Comment