चालू घडामोडी | 12 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी 10 डिसेंबर या दिवशी जगभरात ‘मानवी हक्क दिन’ किंवा ‘मानवाधिकार दिन’ साजरा करतात. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. वर्ष 2020 मध्ये मानवी हक्क दिन “रिकव्हर बेटर – स्टँड आपफोर ह्यूमन राइट्स” या विषयाखाली साजरा करण्यात आला आहे. सार्वत्रिक मानवाधिकार घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) याचे हे 72 वे वर्ष आहे.

2) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बिहारमधील सोने नदीवरील 1.5 कि.मी. लांबीच्या कोईलवार पुलाच्या तीन लेन पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

3) यूके आधारित ईस्टर्न आय वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या ‘वर्ल्ड इन 2020’ या पहिल्या प्रकारातील भारतीय अभिनेता सोनू सूद प्रथम क्रमांकावर आहे.

4) फोर्ब्स संस्थेच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या, जगातल्या सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या 17 व्या वार्षिक क्रमवारीमध्ये जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल या प्रथम क्रमांकावर आहेत. यादीत निर्मला सीतारमण (41 व्या), रोशनी नादर मल्होत्रा (55 व्या), किरण मजूमदार शॉ (68 व्या) आणि रेणुका जगतियानी (98 व्या) या चार भारतीय महिलांना समाविष्ट केले आहे.

5) स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) संस्थेच्या मते, भारत (38 वा) वर्ष 1990 ते वर्ष 2019 या कालावधीत जागतिक पातळीवर सर्वाधिक संरक्षण शस्त्रे खरेदी करणारा देश ठरला आहे.

6) भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) आणि लक्झेमबर्गची CSSF ही आर्थिक संस्था यांच्यादरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या SEBIच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या करारामुळे रोखे नियमनाच्या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहकार्य मजबूत करणे आणि तंत्रज्ञानविषयक माहिती आदानप्रदान करण्यासाठी पर्यवेक्षी कार्याला मदत करून प्रभावीपणे कार्य करण्यासाठी योगदान देणे आणि भारत तसेच लक्झेमबर्गमधील रोखे बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायदे आणि नियमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे ही या कराराची उद्दिष्टे आहेत.

7) टाईम मॅगझीननं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना वर्ष २०२० साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केलं आहे.

8) ASEAN संरक्षण मंत्र्यांच्या ऑनलाईन ‘मिटिंग प्लस’ बैठकीच्या (ADMM+) 10 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 डिसेंबर 2020 रोजी व्हिएतनामच्या हनोई शहरात ‘ASEAN संरक्षण मंत्र्यांच्या 14 वी ऑनलाईन बैठक पार पडली. व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन झुआन फुक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली गेली होती.

भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत :

अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या चमूत निम्म्या महिला आहेत. चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासाने त्यांची निवड चांद्रमोहिमेतील संभाव्य चांद्रवीरात केली आहे.

नासाने बुधवारी १८ संभाव्य चांद्रवीरांची यादी जाहीर केली असून आर्टेमिस चांद्र अवतरण मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. ही मोहीम २०२४ मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे. दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून २०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.

ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत 2927 न्यायालयीन संकुले जोडण्यात आली :

विधी व न्याय मंत्रालयाने ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत देशभरातल्या 2927 न्यायालयीन संकुलांना वाइड एरिया नेटवर्क (WAN) याने जोडण्याचे काम पूर्ण केले आहे. लक्ष्यीत 2992 उद्दिष्टापैकी आत्तापर्यंत 97.86 टक्के काम पूर्ण झाले आहे. ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत जगातले सर्वात मोठ्या डिजिटल नेटवर्क तयार करण्याच्या कामामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीसह अतिवेगवान वाइड एरिया नेटवर्क (WAN) मार्फत वेगवेगळ्या माध्यमाने जोडण्यात येत आहे.

त्यामध्ये ऑप्टिक फायबर केबल (OFC), रेडिओ लहरी (RF), व्ही-सॅट (व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल) यांच्या माध्यमातून जोडणीचे काम चालले आहे. न्यायालयीन संकुलांना जोडण्यासाठी न्याय विभाग व BSNL यांच्यावतीने संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा लाभ होवू शकणार आहे.

Leave a Comment