चालू घडामोडी | 11 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी 11 डिसेंबर रोजी युनिसेफ दिन साजरा केला जातो.

2) दरवर्षी 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो.

3) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने 2024 या वर्षी पॅरिस (फ्रांस) शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ‘ब्रेकडान्सिंग’ याची एक अधिकृत क्रिडाप्रकार म्हणून निवड करण्यात आली आहे.

4) लक्षद्वीप बेटे हा केंद्रशासित प्रदेश भारताच्या सहभागी हमी प्रणाली (PGS) याचा भाग म्हणून 100 टक्के सेंद्रीय शेती करणारा देशातला पहिला ठरला आहे.

5) मध्यप्रदेशातली ग्वाल्हेर आणि ओरछा ही शहरे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

6) जपानी संशोधन आणि दलाली घर नोमुरा यांनी 2021 मध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होणारी आशियाई अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

सी ४० सीटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये सामंजस्य करार :

राज्याचा पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका आणि सी 40 सीटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी करारावर स्वाक्षरी केली. मुंबई शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून यामुळे वाहतुकीचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. घनकचऱ्याचे विभाजन, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

सी -40 शहरांच्या हवामान नेतृत्व समूहाच्या वचनबद्धतेची मुंबई शहर पुष्टी करीत आहे, हे पाहून आनंद वाटला. पर्यावरण रक्षणासाठी जगभरात होत असलेल्या विविध उपक्रमांची मुंबईत अंमलबजावणी करता येईल, असे सांगितले. सामंजस्य करारानुसार हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या जगातील सर्वात मोठ्या शहरांचे जागतिक नेटवर्क असलेल्या सी 40 च्या ध्येयाशी मुंबई शहर वचनबद्ध झाले आहे.

सी 40 सीटीज ग्रुप हा हवामान बदल रोखण्याविषयक ठाम कृती करण्यासाठी जगातील 97 मोठी शहरे जोडतो. निरोगी आणि अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचे या शहरांचे ध्येय्य आहे. 700 दशलक्षाहून अधिक नागरिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करीत सी 40 शहरे स्थानिक पातळीवर हवामान बदलाच्या प्रश्नावर तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वाकांक्षी कृती करण्यास वचनबद्ध आहेत.

ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत 2927 न्यायालयीन संकुले जोडण्यात आली :

विधी व न्याय मंत्रालयाने ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत देशभरातल्या 2927 न्यायालयीन संकुलांना वाइड एरिया नेटवर्क (WAN) याने जोडण्याचे काम पूर्ण केले आहे.

न्यायालयीन संकुलांना जोडण्यासाठी न्याय विभाग व BSNL यांच्यावतीने संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा लाभ होवू शकणार आहे.

ठळक बाबी

  • लक्ष्यीत 2992 उद्दिष्टापैकी आत्तापर्यंत 97.86 टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • ई-न्यायालय प्रकल्पाच्या अंतर्गत जगातले सर्वात मोठ्या डिजिटल नेटवर्क तयार करण्याच्या कामामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीसह अतिवेगवान वाइड एरिया नेटवर्क (WAN) मार्फत वेगवेगळ्या माध्यमाने जोडण्यात येत आहे.
  • त्यामध्ये ऑप्टिक फायबर केबल (OFC), रेडिओ लहरी (RF), व्ही-सॅट (व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल) यांच्या माध्यमातून जोडणीचे काम चालले आहे. BSNLने पूर्वोत्तर राज्ये, जम्मू व काश्मिर, उत्तराखंड, अंदमान व निकोबार बेटे या स्थानांसह भारताच्या कानाकोपऱ्यात आपली संपर्क यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.
  • देशाच्या 14 दुर्गम भागामध्ये बऱ्याच संख्येने ई-न्यायालये आहेत. तिथे डिजिटल विभाजनाचे प्रमाण कमी करण्यासाठी RF, व्ही-सॅट या पर्यायांचा वापर करण्यात आला आहे. त्या दुर्गम भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना ई-न्यायालयाचा लाभ होऊ शकणार आहे.
  • न्याय विभागाने नव्याने उद्‌घाटन झालेल्या सबमरीन केबलचा (समुद्राच्या खालच्या भागातून जाणाऱ्या) वापर करण्याचा निर्णयही घेतला आहे.

Leave a Comment