चालू घडामोडी | 10 जानेवारी 2021

वन लायनर चालू घडामोडी

1) न्यायाधीश हिमा कोहली यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.

2) टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईलोन मस्क हे जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे.

3 ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे ‘ग्लोबल फूड प्राइस इंडेक्स’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याचा निर्देशांक 107.5 अंकांवर होता, तर नोव्हेंबर महिन्यात तो 105.2 होता.

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी सादर केलेली ‘लिगल एंटिटी आयडेनटिफायर’ (LEI) व्यवस्था याच्या अंतर्गत दस्तऐवजाला 20 अंकी संख्या दिली जाते, जे मोठ्या व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) मार्फत होणाऱ्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व व्यवहारांसाठी ही संख्या अनिवार्य करण्यात आली आहे.

5) कर्नाटक राज्यात जगातले एकमेव संसद म्हणून ओळखले जाणारे ‘अनुभव मंतपा’ याची स्थापना केली जाणार आहे. कल्याणी चालुक्य वास्तुकलेच्या शैलीत ही इमारत बांधली जाणार.

6) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री हिस्ट्री सोसायटीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आंध्रप्रदेश राज्यात ‘आशियाई जलपक्षी जनगणना 2020’ केली गेली.

7) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते “लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया WAVE-1 इंडिया रीपोर्ट” हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालासाठी वृद्धत्वाकडे वळणाऱ्या लोकसंख्येचे आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक कारणे आणि परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण झाले. अहवालानुसार, वर्षाला सुमारे 3 टक्क्यांनी वृद्ध लोकांची संख्या वाढणार आणि ती 2050 साली 319 दशलक्षांवर पोहचणार. सुमारे 75 टक्के वृद्ध लोक आजारांनी ग्रस्त आहेत.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

संमेलन २०२०-२१ मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या निश्चित तारखा नाशिकमध्ये २३ आणि २४ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून जाहीर करण्यात येतील. ही ठाले पाटील म्हणाले.

सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वीकारला CISF प्रमुखपदाचा कार्यभार :

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी पोलीस प्रमुख असणारे जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्राच्या सेवेत दाखल झाले आहेत.

जयस्वाल आता 1 लाख 62 हजार जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या सीआयएसएफचे नेतृत्व करणार आहेत. सीआयएसएफवर देशातील विमानतळांबरोबरच अवकाश आणि आण्विक संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

त्या दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहण्याची संधी जयस्वाल यांना सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिळेल. ते सप्टेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

जयस्वाल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1985 च्या तुकडीमधील अधिकारी आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपचे (एसपीजी) ते घटक होते. त्याशिवाय, रॉ या गुप्तचर संस्थेतील कार्याचा अनुभवही त्यांच्या गाठिशी आहे.

भारताने ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ विकसित केले

4 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ आणि ‘भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली’ हे  महत्वाचे शोध राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

ठळक बाबी

  • राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (CSIR-NPL) या संस्थेनी ‘राष्ट्रीय अणु कालमापक’ तयार केला आहे.
  • 2.8 नॅनो सेकंदापर्यंतची अचूक वेळ मोजण्यात कालमापक सक्षम आहे.
  • भारत आता एका नॅनो सेकंदाच्या कालमापन करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आता भारतीय प्रमाण वेळ 3 नॅनो सेकंदापेक्षा कमी अंतराने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेशी जुळते.
  • ह्या प्रणालीची ISRO सारख्या अति अचूक तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांना मोठी मदत होणार आहे. बँकिंग, रेल्वे, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment