चालू घडामोडी | 10 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) मानवाधिकार दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो.

2) भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांची भारतीय मृदा विज्ञान संस्था (IISS, भोपाळ) याला संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) यांच्यावतीने प्रतिष्ठित ‘राजा भूमीबोल जागतिक मृदा दिवस 2020’ पुरस्कार देण्यात आला आहे.

3) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 27 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस म्हणून घोषित केलेल्या ठरावाला मान्यता दिली आहे.

4) भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने 08 डिसेंबर रोजी 53 वा पाणबुडी दिन साजरा केला.

5) द इंडियन एक्स्प्रेसचे लेखक आणि मुख्य संपादक, राज कमल झा यांनी त्यांच्या पुस्तकाचा, सिटी आणि द सी पुस्तकासाठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 पटकाविला आहे.

6) CAN (क्लायमेट अॅक्शन नेटवर्क) यांच्या समवेत जर्मनीची जर्मनवॉच आणि न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट या संस्थांनी जागतिक ‘क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स (CCPI) 2020’ प्रसिद्ध केला आहे. हवामानातल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आधारावर तयार केलेल्या यादीत प्रथम तीन क्रमांक कोणत्याही देशाला दिले गेले नाही आहेत. यादीत चौथा क्रमांक स्विडन देशाला देण्यात आला आहे. यादीत भारताचा क्रमांक दहावा आहे.

7) जागतिक आरोग्य संघटनेनी भारतीय वंशाचे अनिल सोनी यांची WHO फाउंडेशनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. ते 1 जानेवारी 2020 पासून आपली भूमिका सांभाळणार आहेत.

8) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) यांच्यावतीने 2020 या वर्षासाठीचा ‘संयुक्त राष्ट्रसंघ गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार’साठी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या भारतीय उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. जिनेव्हा इथे UNCTAD मुख्यालयी पुरस्काराचे वितरण झाले. जगातल्या सर्वोत्तम गुंतवणूक संस्थांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार’ देवून गौरविले जाते.

9) पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थिवने निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार ‘शक्ती’ कायदा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आले आहेत. तर यामध्ये महत्वाचे म्हणजे महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

तसेच शक्ती या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविण्यात आले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील, असेही निश्चित करण्यात आले. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.

या समितीने तयार केलेल्या दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते. जयंत पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने मसुद्यांना अंतिम रूप दिले आहे.

जगातील सामर्थ्यवान महिलांच्या फोर्ब्सच्या यादीत निर्मला सीतारामन यांना स्थान :

मंगळवारी फोर्ब्सने २०२० मधील पहिल्या १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून त्यात जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल सलग दहाव्या वर्षी प्रथम क्रमांकावर राहिल्या आहेत तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन याना या यादीत ४१ वे स्थान मिळाले आहे.

याशिवाय, भारतीय महिलांत रोशनी नाडर मल्होत्रा ५५, किरण शॉ मुझुमदार ६८ व्या तर लँडमार्क समूहाच्या अध्यक्ष रेणुका जनतियानी ९८ व्या क्रमांकावर आहेत.फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे.

Leave a Comment