चालू घडामोडी | 1 जानेवारी 2021

वन लायनर चालू घडामोडी

1) आर्या राजेंद्रन (21 वर्ष) या महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. त्यांनी केरळच्या तिरुअनंतपुरम नगरपालिका येथे महापौर पद सांभाळले.

2) स्कायरूट एरोस्पेस या भारतीय स्टार्ट-अप कंपनीने घन-इंधनावर चालणाऱ्या ‘कलाम-5’ नामक रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले. मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 1 जानेवारी 2021 रोजी ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज – इंडिया (GHTC-इंडिया) अंतर्गत सहा राज्यांमधल्या ‘लाइट हाऊस’ (प्रकाशदिवे-गृह) प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. इंदूर (मध्यप्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), अगरतळा (त्रिपुरा) आणि लखनौ (उत्तरप्रदेश) येथे लाइट हाऊस बांधण्यात येणार आहेत.

5) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची “ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन” या संस्थेच्या GAVI मंडळावर एक सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते दोन वर्षांसाठी (2021 ते 2023) भारताचे प्रतिनिधित्व करणार.

6) समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर लडाख केंद्रशासित प्रदेशातल्या लेह शहरात भारतातले सर्वोच्च उंचीवर एक हवामानशास्त्र केंद्र उघडण्यात आले आहे.

7) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) या संस्थेनी सागरी माहिती आणि पूर्वानुमान सेवांविषयी माहिती सामायिक करण्यासाठी संकेतस्थळ-आधारित एक मंच तयार केला आहे. त्याला “डिजिटल ओशन” असे नाव देण्यात आले आहे. “डिजिटल ओशन” मंचावर भौगोलिक तंत्रज्ञानामधील वेगवान प्रगती स्वीकारून विषम महासागर विज्ञान विषयक माहिती व्यवस्थित करून ती सादर करण्यासाठी विकसित केलेल्या अनुप्रयोगांचा एक संच आहे.

8) पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने नुकताच यूएनडीपी इंडियाशी सामंजस्य करार केला असून भारताचा पहिला सोशल इम्पॅक्ट बाँड (SIB) तयार केला आहे.

9) भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू नमिता टोप्पो यांना तिच्या खेळातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘एकलव्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी :

भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.

सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे.

आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल.यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यावतीने ‘ICC अवॉर्ड्स ऑफ द डिकेड (2011-2020)’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

‘ICC मेन्स ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – विराट कोहली.

‘ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड’ म्हणून ‘ICC सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार 2020’ याचा विजेता – विराट कोहली.

‘ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – महेंद्रसिंग धोनी.

‘ICC मेन्स टेस्ट प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया).

‘ICC मेन्स T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्काराचा विजेता – रशीद खान (अफगाणिस्तान).

‘ICC विमेन्स प्लेअर ऑफ द डिकेड’, ‘रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार’, ‘ODI प्लेअर ऑफ द डिकेड’ आणि ‘T20I प्लेअर ऑफ द डिकेड’ या पुरस्कारांची विजेता – एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया).

Leave a Comment