चालू घडामोडी | 1 फेब्रुवारी 2021

वन लायनर चालू घडामोडी

1) महाराष्ट्र कारागृह विभागाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. या कार्यक्रमामुळे पुण्यातल्या 150 वर्षाहून अधिक जुन्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाला नागरिकांना भेट देता येणार आहे.

2) टाटा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020’ प्रकाशित करण्यात आला आहे. न्याय मिळण्यासंबंधी राज्यांची क्षमता व्यक्त करणारा हा अहवाल आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर त्याच्यापाठोपाठ तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचा क्रम लागतो.

3) “स्ट्रेन्दनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स (STARS)” अर्थात “राज्यांसाठी अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आणि परिणाम बळकटीकरण” या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी शिक्षण मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँक यांच्यात करार झाला.

4) महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ राज्याच्या कोझिकोडे या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे.

5) आर. एस. शर्मा हे आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यास जबाबदार असणारे नवे प्रमुख आहेत. त्यांची नियुक्ती इंदू भूषण यांच्या जागी झाली.

6) 28 जानेवारी 2021 रोजी भारतीय नौदलाची IN FAC T-81 ही फास्ट अटॅक क्राफ्ट युद्धनौका सेवेतून हटविण्यात आली आहे. ती सुपर ड्वोरा MK II श्रेणीतली नौका आहे.

7) इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) संस्थेच्या ‘एशिया-पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स 2021’ याच्या 11 देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर आहे. यादीत सिंगापूरने अव्वल स्थान मिळविले आहे.

8) BCCI सचिव जय शाह हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरात मुख्यालय असलेल्या आशियाई क्रिकेट परिषद (ACC) याचे नवे अध्यक्ष आहेत. त्यांनी नजमुल हसन पापोन यांच्याकडून पदभार घेतला.

9) भारताची सतलज जलविद्युत महामंडळ (SJVN) कंपनी 679 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प नेपाळ देशामध्ये बांधणार आहे.

भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 86 व्या स्थानी:

सार्वजिनक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार जारी करण्यात आलेल्या २०२० च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार (सीपीआय) भारत सहा पायऱ्यांनी खाली घसरत १८० देशांत ८६ व्या स्थानावर आला आहे. ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक जारी करण्यात आला.

शून्य ते शंभर गुणांवरून १८० देशांतील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार १८० देशांची क्रमवारी जारी केली जाते. भारत ४० अंकांनी १८० देशांत ८६ स्थानी आहे. २०१९ मध्ये भारत १८० देशांत ८० व्या क्रमांकावर होता.

२०१९ आणि २०२० मध्ये भारताचे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात (सीपीआय) गुण समान आहेत.

सीपीआय २०२० च्या अहवालानुसार भारत अजूनही भ्रष्टाचार निर्देशांकात खूप मागे आहे. यावर्षी न्यूझीलँड आणि डेन्मार्क ८८ अंकांनी पहिल्या स्थानी आहे. सोमालिया आणि दक्षिण सुदान १२ अंकांनी १७९ व्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment