चालू घडामोडी | 1 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक एड्स दिन १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

2) अलीकडेच, ‘कार्टोसॅट-2एफ’ भारतीय उपग्रहासोबत पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षामध्ये रशियाच्या “कानोपस-5” या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाची टक्कर होता-होता वाचली.

3) गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्थापन केलेल्या अंतर्गत कार्यकारी गटाने (आयडब्ल्यूजी) विविध शिफारसी केल्या आहेत, त्यामध्ये बँकिंग रेगुलेशन कायद्यात आवश्यक त्या सुधारणेनंतरच मोठ्या कंपन्यांना बँकांना बढती देण्याची परवानगी मिळू शकते.

4) केंब्रिज डिक्शनरी या संस्थेनी ‘वर्ल्ड ऑफ द इयर 2020’ म्हणून ‘क्वारंटाईन’ या शब्दाची निवड केली.

5) पुणे (महाराष्ट्र) शहरातल्या जायंट मीटरवेव रेडियो टेलीस्कोप (GMRT) या संस्थेला त्याच्या महत्त्वपूर्ण तांत्रिक कामगिरी आणि उत्कृष्टतेसाठी इंस्टीट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (IEEE) या संस्थेच्यावतीने ‘IEEE माईलस्टोन पुरस्कार 2020’ देण्यात आला आहे.

6) ‘RT-LAMP’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस लूप-मेडियटेड आइसोथर्मल एम्प्लिफिकेशन) तंत्रज्ञान PCR तंत्रज्ञानापेक्षा अधिक अचूक आहे. ICMR संस्थेनी RT-LAMP तंत्रज्ञानाला 98.7 टक्के संवेदनशील आणि 100 टक्के अचूकता असल्याचे मान्य केले.

7) गुरुग्राम येथील हवाई दलाच्या तळावर सागरी माहितीच्या संदर्भातली केंद्रीय संस्था असणाऱ्या भारतीय नौदलाच्या माहिती व्यवस्थापन व विश्लेषण केंद्राचे (IMAC) नाव बदलून ‘नॅशनल मेरीटाइम डोमेन अवेयरनेस (NMDA) सेंटर’ हे ठेवण्यात येणार आहे.

8) कोलंबो येथे भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात त्रिपक्षीय सागरी सुरक्षा सहकार्या विषयी चौथी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय बैठक झाली.

9) कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती.

“मिशन कोविड सुरक्षा”: कोविड-19 लस विकसित करण्याला गती देण्यासाठीचे अभियान :

भारतीय कोविड-19 लस विकसित करण्याला गती देण्यासाठी केंद्र सरकारने “मिशन कोविड सुरक्षा” नामक अभियानाची घोषणा केली आहे. अभियानासाठी 900 कोटी रुपयांचा तिसरा प्रोत्साहनपर वित्तपुरवठा जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय कोविड-19 लसींच्या संशोधन आणि विकासासाठी जैव तंत्रज्ञान विभागाला हे अनुदान दिले गेले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग ‘कोविड सुरक्षा अभियान’ची अंमलबजावणी करीत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 900 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

राज्यात ३३१ वाघ, ६६९ बिबट; भारतीय वन्यजीव संस्थानकडून अहवाल जाहीर

राज्यात ३३१ वाघ आणि ६६९ बिबट असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे. सन २०२० च्या या अहवालात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आणि १३१ बिबट असल्याचे म्हटले आहे.

कॅमेरा ट्रॅप व ट्रान्सेक्ट लाईन पद्धतीने महाराष्ट्रातील वाघांसह वन्यजीवांचे मॉनिटरींग केल्या गेले. यात वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तरीत्या फेज चार अंतर्गत वाघ आणि बिबट्यांचीही संख्या मिळविली आहे.

यात पेंच व्याघ्र अभयारण्यात ३९ वाघ, ६३ बिबट, नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात ९ वाघ, १६२ बिबट, ताडोबा अंधेरी अभयारण्यात ८५ वाघ, १०९ बिबट, बोर अभयारण्यात ६ वाघ, ३० बिबट, ब्रम्हपुरी फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये ५३ वाघ, ८८ बिबट, टिपेश्वर अभयारण्यात ११ वाघ, ६ बिबट आणि सेंट्रल चांदा फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये २३ वाघ आहेत. सेंट्रल चांदा फॉरेस्ट आणि चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हीजन व पैनगंगामध्ये बिबट आढळून आलेले नाहीत.

चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये ३१ आणि पैनगंगामध्ये १ वाघ नोंदविले गेले. शिरपूर तालुका पुणे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकाही वाघाची नोंद नाही. मात्र २२ बिबट शिरपूरमध्ये तर ४७ बिबट संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये दाखवण्यात आले आहेत.

भारतीय वन्यजीव संस्थेकडून प्रकाशित अहवालातील आकडेवारीवरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढतीवर असून वाघांसह बिबट व अन्य वन्यजीव स्थिरावल्याचे स्पष्ट होते.

1 thought on “चालू घडामोडी | 1 डिसेंबर 2020”

Leave a Comment